आपली कॅम्पसाईट किंवा इव्हेंट आमच्या वेबसाइटवर लिस्ट करा
हे आमंत्रण आहे अशा लोकांसाठी जे खऱ्या मनाने कॅम्पिंग चालवतात किंवा नैसर्गिक ट्रेक्स, फायरफ्लाय इव्हेंट्स आयोजित करतात. आम्ही फक्त प्रामाणिक आणि नैतिक लोकांसोबतच काम करतो.
जर तुमची कॅम्पसाईट जंगल भागात असेल किंवा तुम्ही ट्रेक्स, ट्रेल्स, फायरफ्लाय सीझन इव्हेंट्स घेत असाल, तर आमच्या वेबसाइटवर तुमची माहिती लिस्ट करू शकता. त्यामुळे योग्य लोकांपर्यंत पोहोचता येईल — पार्टी किंवा बोनफायर शोधणाऱ्या नाही तर फायरफ्लायजप्रेमींना.
💬 तुमचा कॅम्प आमच्या वेबसाइटवर लिस्ट कसा करायचा?
फॉर्म-फॉर्म नाही. डिरेक्ट मेसेज पाठवा — सोपं आणि थेट.
- ✔ फक्त हा मेसेज व्हॉट्सॲप वर पाठवा: "मी एक कॅम्पसाइट मालक आहे, माझा कॅम्प तुमच्या वेबसाईटवर लिस्ट करायचा आहे."
- ✔ आम्ही तुमच्याकडून बेसिक माहिती मागू — फोटो, लोकेशन, दर, सुविधा वगैरे.
- ✔ जर तुमचा कॅम्प आमच्या नियमांमध्ये बसला, तर २४–४८ तासांत लिस्ट होतो.
- ✔ बुकिंग तुम्ही स्वतः सांभाळा. आमचं काम फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे.
व्हॉट्सॲप वर क्लिक करा आणि आजच सुरुवात करा.
📌 तुमचं कॅम्प Verified का असावं?
- ✔ firefliesfestival.com वर तुमचं नाव येईल — हाय ट्रस्ट आणि जास्त लोकं येतात इथे.
- ✔ Verified बॅज मिळतो — ज्यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात.
- ✔ व्हॉट्सॲप वर डायरेक्ट ट्रॅफिक येतो, कॉल्स व मेसेजेस वाढतात.
- ✔ सीझन मध्ये आमच्या इंस्टा स्टोरीजमध्ये फीचर करतो.
- ✔ आमच्या सर्व Fireflies Locations पेजवर तुमचं नाव व लिंक दिसतं.
- ✔ तुम्हीच ठरवाल किती लोक घ्यायचं, किती चार्ज करायचं. आम्ही काही लावत नाही.
- ✔ एकही कमिशन लागत नाही. पैसे थेट तुमच्याकडे जातात.
हे Verified कॅम्प बॅज म्हणजे दर्जा, विश्वास, आणि निसर्गप्रेम दाखवण्याची संधी आहे.
📌 व्हेरिफाइड कॅम्पसाइट्स आणि आयोजकांना मिळणारे फायदे
- ✔ तुमचं नाव FirefliesFestival.com वर लिस्ट होतं — हजारो लोकांचा विश्वास असलेली साईट.
- ✔ Verified लिस्टिंग पाहून लोक आरामात बुक करतात — स्कॅमपासून दूर राहतात.
- ✔ Verified टॅगमुळे तुम्ही फेक लोकांपासून वेगळे दिसता.
- ✔ Google आणि WhatsApp वरून ट्रॅफिक मिळतो.
- ✔ तुमचं यूएसपी स्पष्टपणे दाखवतो.
फायनल रिजल्ट: जास्त विश्वासार्ह ग्राहक, कमी कॅन्सलेशन्स, आणि जास्त मान.
📢 आयोजक आणि ट्रेक ग्रुप्स — आमच्यासोबत काम करा
तुम्ही जर ट्रेकिंग ग्रुप, जंगल सफारी आयोजक, किंवा निसर्गप्रेमी इव्हेंट्स करता — तर आमच्या प्लॅटफॉर्मवर लिस्ट होण्यासाठी तुमचं स्वागत आहे.
- ✔ फक्त नैतिक इव्हेंट्स — नो बोनफायर, नो DJ, नो BBQ.
- ✔ सेवा, माहिती, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे लक्ष असावं लागतं.
- ✔ बुकिंग्स, कन्फर्मेशन, आणि कम्युनिकेशन — हे सगळं तुम्ही हाताळता.
- ✔ आम्ही तुम्हाला गूगल आणि सोशल मिडिया वर विश्वासार्ह पोहोच देतो.
- ✔ इव्हेंट्सवर पूर्ण कंट्रोल तुम्हाचाच — आम्ही फक्त verified प्लॅटफॉर्म देतो.
तुमचा इव्हेंट लिस्ट करायचा आहे?
फक्त तुमचं ग्रुप नाव, आधीचे इव्हेंट्स, आणि माहिती आम्हाला WhatsApp वर पाठवा.
क्लिक करा आणि प्रक्रिया सुरू करा
🚫 काही गोष्टी सक्तमन्ये पाळाव्याच लागतील
- ❌ शेकोटी (Bonfire) किंवा धुर करणारे काहीही चालणार नाही — काजव्यांना थेट धोका.
- ❌ बार्बेक्यू चालणार नाही, खास करून रात्री 8 नंतर.
- ❌ स्पीकर, मोठी गाणी किंवा DJ lights सख्त मनाई.
- ❌ फ्लॅश लाईट, डिस्को लाइट, किंवा लेझर शो प्रकार टाळा.
- ✔ स्वच्छ वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी.
- ✔ रात्री 8 नंतर कॅम्पमध्ये शांतता पाळावी लागेल.
- ✔ काय दिसणार आहे याबाबत ट्रान्सपरंट रहा — फेक व्हिडिओ वापरू नका.
- ✔ महिलांसोबत आणि फॅमिलीसोबत नीट वागणं आवश्यक आहे.
हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. कारण आमचं ध्येय फायरफ्लायजचं रक्षण आहे, केवळ वायरल व्हिडीओ मिळवणं नाही.
तुम्ही खरंच नैसर्गिक पर्यटनाला प्रोत्साहन द्यायला तयार असाल तर — चला एकत्र काम करूया. आम्हाला भरपूर ठिकाणं नकोत, भरोसेमंद आणि निसर्गस्नेही ठिकाणं हवीत.
FirefliesFestival.com ला दर आठवड्याला हजारो लोक भेट देतात. तुम्ही खरे आहात आणि नियम पाळता — आम्ही तुमचं स्वागत करतो.
WhatsApp वर संपर्क करा: